Posts

विकसनशील देश आणि अविकसित मानसिकता

“ये इंडिया है यहा सब चलता है भाईसाब” हे वाक्य आपण सर्वच बिनधास्त वापरतो. भारत हा विकानसशिल देश आहे आणि लवकरच विकसित देशांच्या यादीमध्ये आपलं नाव राहील. आपण मेट्रो रेल्वे ने प्रवास करतो आणि लवकरच बुलेट ट्रेन ने हि करू. परंतु या तंत्रज्ञानातील प्रगतीने आपली मानसिकता कितपत बदलेल हा एक प्रश्नच आहे. आपल्या पैकी प्रत्येकालाच रहदारीचा त्रास होतो, रहदारी मध्ये अडकून पडणं हे रोजचच आहे , परंतु हे ट्राफिक जाम आपणच रहदारीचे नियम न पाळल्यामुळे होत याची आपल्याला फिकीर नसते. आपण २ मिनिटं आधी पोचू , पण माझ्या मुळे १०० जणांना उशीर होणार आपल्याला जाण नसते. रस्त्यावरून चालताना होर्न चे आवाज ऐकून अस वाटत कि, सतत होर्न वाजवल्यानेच गाडी पुढे जाते. एखादा दुसरा जो नियम पाळतो त्याला देखील आपण हिणवायला कमी पडत नाही. हाय स्पीड तेजस एक्स्प्रेस जेव्हा सुरु झाली तेव्हा प्रवाशांनी त्यातली हेडफोन चोरली, आणि काही कारण नसताना LCD स्क्रीन फोडल्या. तसं पाहता तेजस ने प्रवास करणारा वर्ग बऱ्यापैकी पैसेवाला आहे तरीही त्यांची अशी कृत्ये लज्जास्पदच आहेत.  रेल्वेतील चादरी चोरीला जातात , पाणपोई चा ग्लास पण साखळी नि बांधून ठे